Rajasthan High Court : २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणार नाही !

राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय

जयपूर (राजस्थान) – राजस्थान उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात २ पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवर बंदी घातली आहे.

वर्ष २०२३ मध्ये तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने २ पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवरील बंदी उठवली होती. यानंतर त्यांना मागील तारखेपासून पदोन्नती दिली जात होती. (मुसलमानांना खुश करण्यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला, हे स्पष्ट आहे. – संपादक)