नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि’ आस्थापनाचे उत्पादन दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहारी सामग्री असल्याचा दावा करणारी याचिका देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यावरून पतंजलि आस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. यावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे.
याचिकाकर्ते अधिवक्ता यतीन शर्मा यांनी आरोप केला आहे की, ‘दिव्य दंतमंजन’मध्ये ‘समुद्र फेन’ (कटलफिश) नावाचा मांसाहारी पदार्थ वापरण्यात येतो. या पदार्थाचा वापर करूनही या उत्पादनाला हिरवे, म्हणजेच शाकाहारी ‘लेबल’ लावण्यात येते.