|
मुंबई – येथे मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे सुमारे २ सहस्र २५३ गुन्हे नोंद झाले आहेत. बलात्कारांचे ९६४ गुन्हे नोंद झाले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. एका वर्षात महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि पॉक्सो नियमांतर्गत ४ सहस्र ३५१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला आणि बालक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत १ सहस्र १३४ गुन्हे नोंद आहेत.
Mumbai : Girls and women are unsafe in the financial capital of the country!
During the year, 4 thousand 351 crimes against women were recorded in Mumbai#SaveOurDaughters #POCSOAct #WomenSafety #CrimeWatch pic.twitter.com/oJuVM22Iyn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2024
मुंबईत घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश आरोपी परप्रांतीय आहेत. त्यामुळे पोलिसांनी मुंबईत येणार्या प्रत्येक परप्रांतियांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करावी, अशी मागणी केली जात आहे.