वर्ष २०२२ मध्ये काश्मीरमध्ये १७२ आतंकवादी ठार !

२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू

(म्हणे) ‘कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपण आणखी एकदा प्रयत्न करूया !’

कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी जनतेवर अमानवी निर्बंध लादणारे शी जिनपिंग यांच्यावर तेथील जनता कशी विश्‍वास ठेवणार ?

झारखंड पोलिसांच्या हातमिळवणीतून होते बांगलादेशमध्ये गोवंशांची तस्करी ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप

याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !

कर्णावती (गुजरात) येथील ‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत धर्मांतराचा प्रयत्न

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !

४२ दिवसांत बेपत्ता असणार्‍या २१ बेपत्ता मुलांना शोधून काढणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याचे सर्वत्र कौतुक !

यापूर्वीही देहली येथील समयपूर बदली पोलीस ठाण्यात मुख्य हवालदार म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अडीच मासात ७६ बेपत्ता मुलांना शोधून काढले होते.

महिला प्रशिक्षकाने केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर हरियाणाच्या क्रीडामंत्र्यांचे त्यागपत्र

संदीप सिंह यांनी ‘माझ्याविरोधात कट रचण्यात आला आहे’, असा आरोप केला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे.

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रा.स्व. संघाचे कोणतेही योगदान नाही !’

नितीश कुमार यांनी भाजपला सोपचिठ्ठी देऊन लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. नितीश कुमार यांच्यात धारिष्ट्य असेल, तर त्यांनी लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री असतांना राज्याला कशा प्रकारे लुटले, याविषयी बोलावे !

पाकमध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेकडून समांतर सरकार घोषित !

पाकने आतंकवाद पोसला. आता हाच आतंकवाद त्याच्या अस्तित्वावर उठला आहे. त्याने जे पेरले, तेच उगवले आहे, असेच म्हणावे लागेल !

भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित केल्यावरून व्हॉट्सअ‍ॅपकडून क्षमायाचना

केवळ क्षमायाचना केल्याने संबंधितांना सोडून देऊ नये, तर गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा झाली, तर अन्य आस्थापनांना याचा वचक बसेल !

कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय जल आयोगाने लादल्या अटी !

आंतरराज्य आणि जलविज्ञान (हायड्रॉलॉजी) संबंधी पैलूंचे पालन करणे अन् म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या निर्णयावर आधारित प्रकल्प उभारणे या अटी आयोगाने कर्नाटक सरकारला घातल्या आहेत.