सातारा येथील शिवप्रेमींचा ‘चारभिंती’ हुतात्मा स्मारकावर खडा पहारा !

३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर सातारा येथील शिवप्रेमींनी इतिहासाची साक्ष देणार्‍या ‘चारभिंती’ या हुतात्मा स्मारकावर खडा पहारा दिला. ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर सातारा शहरातील ऐतिहासिक ‘चारभिंती’वर पर्यटक नेहमीच गर्दी करतात.

शासकीय कार्यालयातील कामकाजांच्या वेळांचे मोठे फलक लावा ! – वाहतूक मित्र मधुकर शेंबडे

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जानेवारी २०२० पासून सर्व शासकीय कार्यालयांच्या वेळा पालटण्यात आल्या आहेत. शासकीय कामकाजाचा आठवडा आता ५ दिवसांचा झाला आहे; मात्र पालटण्यात आलेल्या कामकाजांच्या वेळांचा फलक जिल्हा परिषद कार्यालय वगळता इतर कोणत्याही ठिकाणी लावण्यात आलेला नाही.

मुंबई येथे खोट्या वृत्ताद्वारे धर्मांधाकडून मालकिणीची ५२ लाखांची फसवणूक !

एका पर्यटन आस्थापनाच्या गाडीतून ड्रग्ज आणि वापरलेले कंडोम पोलिसांनी जप्त केले आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी न्यायाधिशापर्यंत पैसे द्यावे लागतील, अशी भीती घालून सोहेल खान याने त्याच्या मालकिणीकडून ५२ लाख रुपये उकळले.

विविध मागण्यांसाठी २ जानेवारीपासून ‘मार्ड’च्या वतीने संपाची चेतावणी

राज्यभरातील ५ सहस्रांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर’च्या) वतीने संपाची चेतावणी देण्यात आली आहे. संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदरूपी स्त्रीदेहाचा बाजार रोखा !

हे पोलिसांना सांगावे का लागते ? लैंगिकतेचे भर रस्त्यात उघड प्रदर्शन करणार्‍यांवर पोलीस स्वतःहूनच कारवाई का करत नाहीत ?

‘क्राईम पेट्रोल’ मालिकेमध्ये आफताब पूनावाला हिंदु दाखवणार्‍या ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी !

लव्ह जिहादच्या प्रकरणाला वेगळे वळण देऊन त्या घटनेची दाहकता अल्प करणार्‍या वाहिन्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. या वाहिन्यांमध्ये सत्य सांगण्याचे धारिष्ट्य नाही का ? अशा वाहिन्यांवर भविष्यात हिंदूंनी बहिष्कार घातल्यास चूक ते काय ?

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला ! – डॉ. एस्.एल. भैरप्पा, ज्येष्ठ साहित्यिक

अभ्यासक्रमातून भारताचा विकृत इतिहास शिकवून काँग्रेसने युवा पिढीची मोठ्या प्रमाणात अपरिमित हानी केली. ती भरून काढण्यासाठी भाजप सरकार, भारतातील बुद्धीजीवी आणि विचारवंत यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक !

कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदुत्वाचा हुंकार दाखवून दिला.

काबूलमध्ये सैन्याच्या तळावरील स्फोटात १० जण ठार

यापूर्वी २९ डिसेंबर या दिवशी अफगाणिस्तानच्या तालुकन प्रांतात स्फोट झाला होता. त्यात ४ जण घायाळ झाले होते.

बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही ! – दलाई लामा

चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले.