नवी देहली – मेट्रो पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी सीमा ढाका यांनी ४२ दिवसांत बेपत्ता असणार्या २१ मुलांना शोधून काढल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वीही देहली येथील समयपूर बदली पोलीस ठाण्यात मुख्य हवालदार म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अडीच मासात ७६ बेपत्ता मुलांना शोधून काढले होते. त्यामुळे त्यांची साहाय्यक उपनिरीक्षकपदी पदोनती झाली होती.
Delhi Police: 42 दिनों में खोजे 21 बच्चे, ‘आउट ऑफ वे’ जाकर भी की गरीबों की मदद, सभी कर रहे दिल्ली की इस पुलिसकर्मी की तारीफ
https://t.co/gaTAQDFbkO— Jansatta (@Jansatta) December 30, 2022
सीमा ढाका यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलांना शोधण्यासाठी मंदिरे, मशिदी, बस्थानके, रेल्वेस्थानके यांठिकाठी शोध घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ढाका या वर्ष २००६ मध्ये देहली पोलीसदलात कार्यरत झाल्या. वर्ष २०१४ मध्ये त्यांची प्रमुख पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती झाली होती.