महिला प्रशिक्षकाने केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर हरियाणाच्या क्रीडामंत्र्यांचे त्यागपत्र

हरियाणाचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंह

चंडीगड – हरियाणाचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंह यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. त्यांच्या विरोधात एका महिला प्रशिक्षकाने विनयभंगाचा आरोप केल्यावर संदीप सिंह यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संदीप सिंह यांनी ‘माझ्याविरोधात कट रचण्यात आला आहे’, असा आरोप केला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे. त्यात ममता सिंह यांच्या नेतृत्वाखाली समर प्रताप सिंह आणि राजकुमार कौशिक यांचा समावेश आहे.