झारखंड पोलिसांच्या हातमिळवणीतून होते बांगलादेशमध्ये गोवंशांची तस्करी ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप

भाजपचे खासदार निशिकांत दुबे

रांची (झारखंड) – झारखंड राज्यातील काही पशूविक्री बाजारांतून पशूवधगृहांसाठी पशूंची खरेदी केली जाते. येथून तस्करीसाठीही पशूंची मोठ्या संख्येने खरेदी केली जाते. विशेषतः गायींची खरेदी करून त्यांची बांगलादेशामध्ये तस्करी केली जाते. यात पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण साहाय्य असते, असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला.

१. झारखंडच्या मोहनपूर, हिरणपूर आणि दुमका या बाजारांमध्ये प्रत्येक आठवड्याला २५ कोटी रुपयांचा व्यवहार होतो. येथून पशू तस्कर गोवंश खरेदी करून आसाममधून नदीच्या मार्गे अवैधरित्या गायींना बांगलादेशात पाठवतात. यात गायींना केळीच्या झाडांच्या खोडाला बांधले जाते. केवळ त्यांचे नाक वर राहील अशा प्रकारे त्यांना बांधले जाते. वरच्या भागातून गायीचा कोणताही अवयव दिसणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांगलादेशमध्ये २ गायी पाठवण्यासाठी ५२ सहस्र रुपये घेतले जातात. तस्करांनी सीमेपासून अर्धा किलोमीटर अलीकडे त्यांचे तळ बनवलेले आहे. या तस्करीविषयी भाजपच्या खासदार मेनका गांधी यांनी यापूर्वीच चिंता व्यक्त करत पोलिसांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

२. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात गोतस्कर गायींना बांगलादेशात पाठवत असल्याचे दिसत आहे, तसेच दुबे यांनी १० सहस्र गायींची सुटका केल्याचाही दावा केला आहे. मोईनुद्दीन आणि अली अन्सारी या दोघांना पोलिसांच्या कह्यात दिल्याचे सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !