पुणे येथील ललित पाटील पलायन प्रकरणी २ पोलिसांना अटक !

अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील ‘ससून’मधून पळून गेला होता. त्‍या वेळी ‘ससून रुग्‍णालया’तील बंदीवानांच्‍या उपचार कक्षात नियुक्‍तीस असलेल्‍या २ पोलिसांनी कर्तव्‍यामध्‍ये कसूर करून पाटील याला पळून जाण्‍यास साहाय्‍य केल्‍याप्रकरणी त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

सावरकर यांच्‍यासाठी ‘हिंदुत्‍व हेच राष्‍ट्रीयत्‍व’ होते ! – योगेश सोमण, ज्‍येष्‍ठ अभिनेते आणि दिग्‍दर्शक

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा धर्माकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन हा विज्ञाननिष्‍ठ होता. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांची प्रत्‍येक कृती, विचार हा राष्‍ट्राकरता होता. सावरकरांसाठी ‘हिंदुत्‍व हेच राष्‍ट्रीयत्‍व’ होते, असे मत ज्‍येष्‍ठ अभिनेते आणि दिग्‍दर्शक योगेश सोमण यांनी व्‍यक्‍त केले.

मोक्ष देण्याचे सामर्थ्य केवळ हिंदु धर्मातच आहे !

‘अनेक हिंदू ‘हिंदु धर्माने आम्हाला काय दिले ? इतर धर्म आम्हाला अनेक गोष्टी देतात !’, असे म्हणून धर्मांतर करतात. ‘केवळ हिंदु धर्मच मोक्ष देतो, इतर धर्म नाही’, हे हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंवर बिंबवणे, हाच खरा धर्मांतर रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१९ नोव्हेंबर : आज, कार्तिक शुक्ल षष्ठी या दिवशी पू. पद्माकर होनप यांची प्रथम पुण्यतिथी आहे.

आज, कार्तिक शुक्ल षष्ठी (१९ नोव्हेंबर २०२३) या दिवशी पू. पद्माकर होनप यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !

पुणे महापालिकेशी संबंधित न्‍यायालयीन दाव्‍यांची स्‍थिती दर्शवणारा अहवाल देण्‍याच्‍या आदेशाची पायमल्ली !

गेल्‍या ९ वर्षांत विधी विभागाने एकही अहवाल सादर केला नसल्‍याने आयुक्‍तांच्‍या आदेशाचे उल्लंघन झाले असून विधी विभाग प्रमुखांना तात्‍काळ निलंबित करावे, अशी मागणी शहरातील स्‍वयंसेवी संस्‍थांनी केली आहे.

हलाल प्रमाणपत्राच्‍या विरोधात अशी कारवाई देशभरात व्‍हावी !

कोणताही अधिकार नसतांना खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदी वस्‍तूंसाठी आस्‍थापनांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्‍यांच्‍याकडून पैसे उकळणार्‍यांच्‍या विरोधात उत्तरप्रदेशातील योगी आदित्‍यनाथ सरकारने इस्‍लामी संस्‍थांवर गुन्‍हा नोंदवला आहे.

केरळमधील हिंदूंचे जीवन भीतीच्या सावटाखाली !

मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत.

भ्रष्टाचार कुणाला संपवायचा आहे ?

भारतामध्ये राजकीय पक्षांना ‘माहितीच्या अधिकारातून’ सूट देणे आणि त्यांच्या उत्पन्न-खर्चाचा दर्जा गोपनीय ठेवण्याची अनुमती देणे, म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराचा विशेषाधिकार देण्यासारखे आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा उद्देशच हरपला आहे !

चित्रपटसृष्टीमध्ये समाजप्रबोधनाची अचाट शक्ती आहे; परंतु ती मानसिकता बाळगणारे दिग्दर्शक आणि निर्माते तुरळकच असतात. चित्रपट हे भारतियांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून उमेद निर्मिती आणि मार्गदर्शन यांचे साधन आहे, याचे भान सिनेसृष्टीने बाळगणे आवश्यक आहे.