कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका !
पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील ‘ससून’मधून पळून गेला होता. त्या वेळी ‘ससून रुग्णालया’तील बंदीवानांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या २ पोलिसांनी कर्तव्यामध्ये कसूर करून पाटील याला पळून जाण्यास साहाय्य केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी त्यांची नावे आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ललितच्या साथीदारासह ‘ससून’च्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली होती. त्यांच्याकडून २ कोटी रुपयांचे ‘मेफेड्रोन’ जप्त करण्यात आले होते. अन्वेषणामध्ये ‘ससून’च्या रुग्ण विभाग १६ मध्ये वैद्यकीय उपचार घेणारा ललित हा अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे पुढे आले. त्यानंतर उपचार घेणार्या ललितला नोटीस बजावण्यात आली. त्याला कह्यात घेण्याची कारवाई चालू असतांनाच २ ऑक्टोबर या दिवशी ललित बंदोबस्तातील पोलिसांना गुंगारा देत रुग्णालयातून पळून गेला होता.
संपादकीय भूमिकागुन्हेगाराला साहाय्य करणार्या अशा पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच पोलीस प्रशासनात सुधारणा होऊ शकते ! |