भारतीय चित्रपटसृष्टी ही परकीय चित्रपटसृष्टीचे अनुकरण करण्यात एवढी हरपून गेली आहे की, स्वतःचे स्वत्वच विसरली आहे. परकीय चित्रपटांमधील अश्लीलता हा केवळ कथानकातील एक भाग असतो, तर याउलट भारतीय चित्रपटसृष्टी त्या एका विषयभोवतीच फिरत आहे.
चित्रपटांमध्ये अश्लीलता हा केंद्रस्थानी ठेवला जात असून कथानकाला काहीच मूल्य उरलेले नाही. परकियांची नक्कल करतांना चांगल्या गोष्टी घेणे अपेक्षित असते; परंतु भारतीय समाजाचे हे वैशिष्ट्य आहे की, आपण लोक जे वाईट आहे, ते आधी स्वीकारतो. खरे पाहिले, तर चित्रपटसृष्टीमध्ये समाजप्रबोधनाची अचाट शक्ती आहे; परंतु ती मानसिकता बाळगणारे दिग्दर्शक आणि निर्माते तुरळकच असतात. चित्रपट हे भारतियांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून उमेद निर्मिती आणि मार्गदर्शन यांचे साधन आहे, याचे भान सिनेसृष्टीने बाळगणे आवश्यक आहे.
– डॉ. कुलदीप शिरपूरकर, नाशिक.