पुणे येथील ‘हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र राज्य’ आयोजित पारितोषिक वितरण सोहळा !
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोन हा विज्ञाननिष्ठ होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रत्येक कृती, विचार हा राष्ट्राकरता होता. सावरकरांसाठी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ होते, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक योगेश सोमण यांनी व्यक्त केले. ते ‘हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र राज्य’ आयोजित ‘गणेशोत्सव आरास स्पर्धा’ २०२३ च्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. या वेळी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर, समितीचे देवव्रत बापट, विद्याधर नारगोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमण पुढे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून घराघरांमध्ये सावरकरांचे विचार पोचवण्याचे कार्य चालू आहे. सावरकर समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्या जीवनातील एखादा प्रसंग किंवा कालखंड पुरेसा नाही. वेगवेगळ्या चर्चेतून सावरकरांचे विविध पैलू समोर येतील.