अतिरिक्‍त भाडे आकारणार्‍या ‘ऑनलाईन बुकिंग अ‍ॅप’वर कारवाई करा ! – ‘सुराज्‍य अभियाना’चे निवेदन

प्रशासन स्‍वत:हून हे का करत नाही ?

‘ऑनलाईन गेम’ खेळण्‍यासाठी चोर्‍या करणार्‍या तरुणाला अटक

अभिमन्‍यू गुप्‍ता नावाचा तरुण ‘ऑनलाईन गेम’ खेळण्‍यासाठी चोरी करत असल्‍याचे उघडकीस आल्‍याने साकीनाका पोलिसांनी अटक केली. येथील एकाच्‍या घरातून पैसे चोरीला गेल्‍यावर घरफोडीचा गुन्‍हा नोंद झाला होता.

कार्ला (पुणे) येथील ‘एकवीरादेवी देवस्‍थान’ न्‍यासातील २ संचालक हे देवीचे खरे भक्‍त असावेत !

कार्ला येथील प्रसिद्ध ‘एकवीरादेवी देवस्‍थाना’तील २ संचालकांची निवड ही गुप्‍त पद्धतीने करावी. हे संचालक देवीचे खरे भक्‍तच असावेत, असा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालाला सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती देण्‍यास नकार दिला.

सनातन धर्माविषयी धार्मिक भावना दुखावणारे वक्‍तव्‍य करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍याकडून नगर येथील वीर सावरकर चौक, चौपाटी कारंजा या ठिकाणी घेण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. प्रतीक्षा कोरगावकर बोलत होत्‍या.

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍या नेत्‍यांवर कठोर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे खेळमंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे ‘द्रमुक’ खासदार ए. राजा यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी…

लोकसभा आणि विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक सादर

‘नारी शक्ती वंदन’ या नावाने सादर करण्यात आलेल्या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

करीमा बलूच यांच्या हत्येच्या वेळी ट्रुडो यांनी मौन बाळगले होते ! – निवृत्त कॅप्टन अनिल गौर

करीमा बलूच यांच्या हत्येच्या प्रकरणातकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मौन बाळगले होते. आता ट्रुडो खलिस्तान्यांना समर्थन देऊन स्वतःची सत्ता वाचवू पहात आहेत- निवृत्त कॅप्टन अनिल गौर

युक्रेन-रशिया युद्धात गुप्तपणे शस्त्रे पुरवल्याने पाकला मिळाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्यता निधी !

‘रशियाशी लढण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे शस्त्रे पुरवली होती. युद्धाच्या काळात युक्रेनच्या सैन्याने त्यांचा वापर केला यातून रशिया – युक्रेन युद्धात पाकिस्तानचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते.

श्रीलंकेकडून पुन्हा एकदा चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला बंदरावर थांबवण्याची अनुमती !

आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्यासाठी चीनने नाही, तर भारताने साहाय्य केले होते. त्यानंतर श्रीलंका पुन्हा उभा रहात आहे; मात्र याची परतफेड श्रीलंका जर अशा प्रकारे करत असेल, तर भारताने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे !

मोगा (पंजाब) येथे खलिस्तानी आतंकवाद्यांकडून काँग्रेसच्या नेत्याची हत्या !

याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तोंड उघडतील का ? अर्श डल्ला याच्यावर कारवाई करतील का ?