‘ऑनलाईन गेम’ खेळण्‍यासाठी चोर्‍या करणार्‍या तरुणाला अटक

ऑनलाईन गेम’च्‍या व्‍यसनाचेे दुष्‍परिणाम किती भयंकर असू शकतात, हे दर्शवणारी घटना !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – अभिमन्‍यू गुप्‍ता नावाचा तरुण ‘ऑनलाईन गेम’ खेळण्‍यासाठी चोरी करत असल्‍याचे उघडकीस आल्‍याने साकीनाका पोलिसांनी अटक केली. येथील एकाच्‍या घरातून पैसे चोरीला गेल्‍यावर घरफोडीचा गुन्‍हा नोंद झाला होता. सीसीटीव्‍ही चित्रणात पोलिसांना अभिमन्‍यूचा चेहरा दिसला. वेगवेगळ्‍या माध्‍यमातून माहिती काढत असतांना तो रांची येथे असल्‍याचे समजले. पोलिसांच्‍या पथकाने रांची येथे जाऊन त्‍याला कह्यात घेतले.

अभिमन्‍यू हा पूर्वी ‘टिकटॉक स्‍टार’ आणि त्‍याचे अनेक ‘फॉलोअर्स’ असल्‍याचेही पुढे आले आहे. अभियंता असलेल्‍या अभिमन्‍यूला ‘ऑनलाईन गेम’ खेळायची सवय आणि पुढे व्‍यसन लागल्‍याने त्‍याने चोर्‍या करण्‍यास आरंभ केला. त्‍यातून त्‍याच्‍यावर १२ गुन्‍हे नोंद झाले आहेत.