कोल्हापूर – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’ आणि अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त तथा प्रवासी यांची लूटमार चालू आहे. खासगी प्रवासी बसचालक प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट आणि कधी चौप्पट दरआकारणी करत आहेत. आजच्या ‘ऑनलाईन’ युगात ९० टक्के वाहनांचे आरक्षण हे खासगी प्रवासी तिकीट बुकिंग अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ होते; त्याकडे मात्र राज्य परिवहन विभागाचे लक्षच नाही. तरी अतिरिक्त भाडे आकारणार्या ‘ऑनलाईन बुकिंग अॅप’वर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. दीपक पाटील यांना देण्यात आले. (प्रशासन स्वत:हून हे का करत नाही ? – संपादक) या प्रसंगी भाजपचे श्री. दिलीप बोंद्रे, सुराज्य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. मधुकर नाझरे उपस्थित होते.