कॅनडाकडून भारतावर हत्येचा आरोप करत उच्चाधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश !

कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.

सिवान (बिहार) येथे भाजपच्या प्रभाग अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने जात आहे, हेच अशा घटनांवरून लक्षात येते !

(म्हणे) ‘मंदिरात माझ्यासमवेत जातीभेद करण्यात आला !’ – के. राधाकृष्णन्, मंदिर व्यवहारमंत्री, केरळ

के. राधाकृष्णन् यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !

खासदारांनी घेतला जुन्या संसदेचा निरोप !

जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनामध्ये जाण्यापूर्वी सर्व खासदारांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्र येऊन निरोप घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खासदारांना संसद भवनाच्या नव्या इमारतीत घेऊन गेले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

‘सर्व देशवासियांना श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपति बाप्पा मोरया !’, अशा शब्दांत मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

तमिळनाडूमध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम ! – सर्वोच्च न्यायालय

तमिळनाडू राज्यामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम असणार आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी यावर बंदी घातली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

उज्‍जैन आणि ओंकारेश्‍वर येथे महाराष्‍ट्रातील पर्यटक अडकल्‍याची भीती !

मध्‍यप्रदेशातील दक्षिण भागात गेल्‍या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्‍यामुळे नर्मदा आणि क्षिप्रा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. ओंकारेश्‍वर जलाशयातील पाण्‍याचा मोठा विसर्गही नर्मदा नदीमध्‍ये सोडण्‍यात आला आहे.

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करण्‍यासाठी ठाकरे गटाचा ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ !

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करावा, पुन्‍हा कार्यान्‍वित करू नये, या मागणीसाठी मावळ तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्‍या वतीने पवनानगर येथे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला.

संभाव्‍य आतंकवादी आक्रमण, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून कडक बंदोबस्‍त !

हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांवर अद्यापही आतंकवादी आक्रमणाचे सावट असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍यासाठी सांगलीत भव्‍य मोर्चा !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्‍य मागण्‍यांसाठी मराठा समाजाच्‍या वतीने भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला.