मतदान केंद्रांवर भ्रमणभाष नेता येणार नाही !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या आदेशाचे समर्थन !

मुंबई – मतदानाच्‍या ठिकाणी मतदारांना भ्रमणभाष सोबत नेण्‍यास बंदी घालणार्‍या केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या १४ जून २०२३ या दिवशीच्‍या आदेशात काही चुकीचे दिसत नाही आणि आयोगाचा तो निर्णय बेकायदाही वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्‍च न्‍यायालयाने याविषयीची जनहित याचिका फेटाळली. त्‍यामुळे २० नोव्‍हेंबर या दिवशी मतदारांना मतदान केंद्रांवर समवेत भ्रमणभाष नेता येणार नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे.