श्रीलंकेकडून पुन्हा एकदा चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला बंदरावर थांबवण्याची अनुमती !

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेचा निर्णय

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने पुन्हा एकदा भारताचा विश्‍वासघात करत चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला कोलंबो बंदरावर थांबवण्याची अनुमती दिली. गेल्या वर्षीही भारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकाला हंबनटोटा बंदरावर थांबण्याची अनुमती दिली होती.
‘शी यान ६’ ही नौका संशोधनाच्या नावाखाली हिंदी महासागरामध्ये हेरगिरी करते. पुढील ३ मास ही नौका हिंदी महासागरात वावरणार आहे. गेल्या वर्षी ‘यूआन वांग ५’ ही हेरगिरी करणारी नौका श्रीलंकेत थांबली होती. त्या वेळी भारतानेच नाही, तर अमेरिकेनेही यास विरोध केला होता.

संपादकीय भूमिका 

आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्यासाठी चीनने नाही, तर भारताने साहाय्य केले होते. त्यानंतर श्रीलंका पुन्हा उभा रहात आहे; मात्र याची परतफेड श्रीलंका जर अशा प्रकारे करत असेल, तर भारताने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे !