माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण
नागपूर – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर १८ नोव्हेंबरच्या रात्री आक्रमण करण्यात आले. यात ते गंभीर घायाळ झाले. त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात भरती केले आहे. याप्रकरणी ४ अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग करणार्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल’, असे पोलिसांनी सांगितले आहे. ज्येष्ठ सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या प्रचारकाळात केली जाणारी भडकाऊ भाषणे अशा आक्रमणांना कारणीभूत आहेत, असे मला वाटते. प्रत्येक नेत्याने संयम ठेवायला हवा.’’