‘सुराज्य अभियाना’च्या वतीने ठिकठिकाणी व्याख्यानांतून प्रबोधन !
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात सार्वत्रिक मतदान २० नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. या निमित्ताने राज्यातील समस्त जनतेने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तसेच महाराष्ट्राची संस्कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्याला मतदान करावे, असे आवाहन जाहीर व्याख्यानाद्वारे विक्रोळी, धारावी आणि माहीम या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी म्हणाले की, बर्याचदा निवडणुकीची रजा आहे, तर काही जण मतदानास प्राधान्य न देता बाहेर फिरण्यास किंवा घरी विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात, राष्ट्र कर्तव्य म्हणून सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. सुराज्य अभियानाचे सदस्य आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक म्हणाले की, नागरिकांचे आपले एक मत सुराज्यासाठी आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते, यासाठी सर्व जनतेने सतर्कतेने मतदान करावे.