सनातन धर्माविषयी धार्मिक भावना दुखावणारे वक्‍तव्‍य करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

नगर येथे हिंदु राष्‍ट्र आंदोलनाद्वारे मागणी

नगर – स्‍वत:ला ख्रिस्‍ती मानणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलीन यांना सनातन धर्म नष्‍ट करायचा आहे, तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही.  तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहेत. कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदय यांचे समर्थन केले असून तमिळनाडू येथील द्रमुक पक्षाचे खासदार ए. राजा यांनीही सनातन धर्माची तुलना एच्.आय.व्‍ही. (एड्‌स) आणि कुष्‍ठरोग यांसारख्‍या रोगांशी केली. असे सरकार हिंदूंची मंदिरे चालवणार कि ती नष्‍ट करणार ? असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केला. हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍याकडून नगर येथील वीर सावरकर चौक, चौपाटी कारंजा या ठिकाणी घेण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात त्‍या बोलत होत्‍या.

या गणेशोत्‍सवामध्‍ये सर्व हिंदु बांधवांनी कुठलीही वस्‍तू खरेदी करतांना ती हलाल ‘लोगो’ नसलेली पाहूनच घेऊन अशा प्रकारे हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा करण्‍याचा निश्‍चय केला.

प्रतिक्रिया :

सुरेखा विद्ये (जिल्‍हाध्‍यक्ष, भाजप महिला आघाडी) – उदयनिधी स्‍टॅलिन हे इतर धर्मीय असून त्‍यांना हिंदु धर्माबद्दल बोलण्‍याचा अधिकार नाही. कोणताही हिंदु हे खपवून घेणार नाही.

गोरक्षनाथ तांदळे – ही घटना घडून बरेच दिवस झाले, तरी अजून कुणावरही गुन्‍हा नोंद केला नाही. हिंदूंचे सण आणि हिंदु धर्म यांवर टीका करणे, हे निषेधार्ह आहे. या विरोधात सर्वांनी जागृत होणे आवश्‍यक आहे.

कुणाल भंडारी, बजरंग दल – उदयनिधी स्‍टॅलिन, ए. राजा, प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्माविषयी केलेले वक्‍तव्‍य हे निषेधार्ह असून त्‍यांनी राज्‍यघटनेचा अपमान केला आहे. त्‍यांना पदावर रहाण्‍याचा अधिकार नाही.