|
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) – रात्रीच्या वेळी घरात घुसून एक हिंदु महिला आणि तिची १२ वर्षीय मुलगी यांच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्या वासनांध रेहान लतीफ (वय २७ वर्षे) याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. त्यांनतर लतीफ याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे पदाधिकारी दोडामार्ग पोलीस ठाण्यात एकत्र आले. लतीफ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे दोडामार्गमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
१. रेहान लतीफ हा भेडशी येथील थोरले भरड परिसरात रहातो. त्याची पार्श्वभूमीही वादग्रस्त असल्याचे समजते.
२. पैशांचे आमिष दाखवून हिंदु महिला आणि मुली यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना वाममार्गाला लावण्याचे काम तो करत असल्याचा आरोप केला जात आहे.
३. यापूर्वी त्याने एका हिंदु मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून स्वत:च्या घरात आणून ठेवले होते. ज्या ज्या वेळी आजूबाजूच्या हिंदूंबरोबर वादाचे प्रसंग उद्भवायचे, तेव्हा तेव्हा तो त्या महिलेला पुढे करायचा.
४. सार्वजनिक रस्ता बंद करणे, रस्त्याने जाणार्यांना अर्वाच्च शब्दांत बोलणे, लोकांशी भांडण करणे, गांजा विक्री करणे, हिंदु महिला आणि मुली यांच्याकडे वाईट दृष्टीने पहाणे, असे अनेक प्रकार त्याने केल्याचे बोलले जाते.
५. काही महिन्यांपूर्वी एक स्थानिक युवक वाहन मागे घेत असतांना त्या युवकाच्या वाहनाला लतीफ याने स्वत:च्या वाहनाने धडक दिली. त्यामुळे लतीफ याच्या वाहनाचा एक दिवा फुटला. या वेळी लतीफ याने त्या तरुणाने दिवा फोडल्याचा कांगावा करत त्याच्याकडून पैसे वसूल केले.
संपादकीय भूमिका
|