पंढरपूर – कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे झालेल्या यात्रा कालावधीत मंदिरे समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून ३ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात प्रामुख्याने ६ लाख बुंदी लाडू प्रसादाची विक्री झाली आहे. ‘ऑनलाईन’ सुविधेचा वापर करून २१ लाख ६९ सहस्र रुपये इतकी रक्कम जमा झाली. इतर जमेमध्ये भक्तनिवास, दानपेटी, शेणखत, महावस्त्र, चंदन पावडर, भूमी खंड आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे, अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या थोडी अल्प होती; मात्र यंदा मंदिरे समितीने भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.