राजकीय हस्तक्षेपाची चर्चा !
मुंबई – अजित पवार यांना त्यांचे पुतणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलेले आहे, तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या ‘शरयू मोटर्स’वर मध्यरात्री पोलिसांनी शोधमोहीम केली. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पडताळणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. त्या तक्रारी नंतर ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे; मात्र नेमके या ‘शोरूम’मध्ये काय सापडले ? कोणत्या कारणाने शोध करण्यात आला ? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.