करीमा बलूच यांच्या हत्येच्या वेळी ट्रुडो यांनी मौन बाळगले होते ! – निवृत्त कॅप्टन अनिल गौर

 

करीमा बलूच आणि जस्टिन ट्रुडो

नवी देहली – पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि पाकिस्तानी सैन्य बलुची लोकांवर करत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या बलुची नेत्या करीमा बलूच यांची ३ वर्षांपूर्वी कॅनडामध्ये हत्या करण्यात आली. तेव्हा म्हटले गेले होते की, करीमा बलूच यांच्या हत्येच्या प्रकरणात पाकची गुप्तचर संख्या आय.एस्.आय.चा हात होता.

त्या वेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मौन बाळगले होते. आता ट्रुडो खलिस्तान्यांना समर्थन देऊन स्वतःची सत्ता वाचवू पहात आहेत, असे वक्तव्य निवृत्त कॅप्टन अनिल गौर यांनी केले आहे.