मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात अद्यापही गोहत्या बंदी कायदा असल्याने विशेष पशूचा बळी देऊ नये !

गोहत्या कायदा असला, तरी कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने या कायद्याचे किती पालन होईल, याकडे गोरक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे !

नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित करणे हा समस्त हिंदूंवरील आघात ! – चिरण वीर प्रताप खड्का, प्रमुख, ॐ रक्षा वाहिनी, नेपाळ

मागील १ दशकापासून नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित करून समस्त हिंदूंच्या श्रद्धेवर प्रहार करण्यात आला आहे. नेपाळ लवकरच हिंदु राष्ट्र होईल. नेपाळसह संपूर्ण विश्वाला हिंदु राष्ट्र करण्याचे ध्येय हिंदूंनी बाळगायला हवे. यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट व्हावे, असे आवाहन त्यांनी केले

टायटॅनिक नौकेचे अवशेष पहाण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता !

‘टायटॅनिक’ ही महाकाय प्रवासी जहाज अटलांटिक महासागरातील एका हिमनगाला धडकल्याने बुडाले होते. त्याचे अवशेष पहाण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली.

पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीसाठी अमेरिकेने आमंत्रित केलेले ते आतापर्यंतचे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करावा ! – अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदू फेडरेशन

बांगलादेशातील हिंदु मुलींवर प्रतिदिन बलात्कार होत आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, तसेच हिंदूंच्या भूमी लुटल्या जात आहेत. हिंदू अक्षरश: गुलामीचे जीवन जगत आहेत. ते कमकुवत आणि भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उद्गार त्यांनी काढले

हिंसाचार थांबवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा !

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पुढे म्हटले की, मी सशस्त्र मेईतेई लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कुणावरही आक्रमण करू नये आणि शांतता राखावी, तरच राज्यात परिस्थिती पूर्ववत् होईल.

दक्षिण पूर्व आशियात भूकंपाचे धक्के !

‘सी.जी.टी.एन्.’ या चिनी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ असलेल्या समुद्रात २४ किमी खोल होते.

बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी केंद्रीय बलांची नियुक्ती योग्य ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पंचायत स्तरावरील निवडणुकांसाठी  केंद्रीय बलांची नियुक्ती करावी लागते, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे !