
रामनाथी (फोंडा), २० जून (वार्ता.) – मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ४ मासांत महाराष्ट्रातील १३१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली. गोवा राज्यातील फोंडा येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’, ‘मंदिर संरक्षण’ आणि ‘मंदिर सरकारीकरण अन् अतिक्रमण यांतून मुक्ती’ आदी विविध विषयांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले.

या वेळी सुनील घनवट म्हणाले की, ‘‘विविध चित्रपटांचे चित्रीकरण देशभरातील पौराणिक, ऐतिहासिक मंदिरांच्या परिसरात होते. या चित्रीकरणाच्या कालावधीत मंदिरांचे पावित्र्य मंदिरांतील वस्त्रसंहिता, तसेच मंदिर परिसरातील नियम यांचे पालन होत नाही. या नियमांचे पालन होण्यासाठी विविध मंदिरांना निवेदन देऊन त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचसमवेत जिल्हा पातळीपासून ते गावपातळीपर्यंत ‘पुजारी संपर्क अभियान’ राबवले जाणार आहे.’’

या बैठकीसाठी गोवा येथील गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग श्री भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. सुरेश कौदरे, विदर्भ देवस्थान समितीचे सचिव श्री. अनुप जयस्वाल, महाराष्ट्र अन् गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, मंगळग्रह सेवा संस्थानचे श्री. शरद कुलकर्णी, नगर येथील श्री भवानीमाता मंदिराचे अधिवक्ता अभिषेक भगत, नागपूर येथील श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त श्री. रामनारायण मिश्र आणि संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिराचे श्री. दिलीप कुकडे यांसह ४० मान्यवर उपस्थित होते.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड