इस्लामी देश इंडोनेशिया भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत !

फिलिपाईन्सनंतर इस्लामी देश इंडोनेशिया भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत आहे. भारत इंडोनेशियाला नौकाविरोधी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री करणार आहे.

जकार्ता समुद्रात बुडण्याच्या शक्यतेने इंडोनेशिया नुसंताराला बनवणार राजधानी !

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता  पुढील काही वर्षांत समुद्रात पूर्णतः बुडण्याची शक्यता असल्याने इंडोनेशियाने राजधानी पालटण्याचा निर्णय घेत नुसंतारा हे शहर यापुढे राजधानी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोनेशियातील मुसलमानांना हिंदु धर्माचे आकर्षण !

एकट्या बाली बेटावर २० सहस्रांहून अधिक मंदिरे आहेत, जी स्वत:च एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय जकार्ता आणि अन्य बेटांवरही अशी अनेक मंदिरे शोधण्यात आली आहेत. त्यामुळे इंडोनेशियाचे मुसलमान सातत्याने हिंदु धर्माशी संबंध अनुभवत आहेत. हाच अनुभव त्यांना हिंदु धर्मामध्ये परतण्याची प्रेरणा देत आहे.

इंडोनेशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लपवून ठेवणार्‍या इस्लामी धर्मगुरूला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले.

इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू

येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने बेपत्ता लोकांच्या शोधामध्ये अडथळे येत आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाची चिनी कोरोना लसीला मान्यता

‘चिनी कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश आहे’, असे सांगत त्याला विरोध करणार्‍या इस्लामी राष्ट्र इंडोनेशियाला जशी ‘यात डुकराचा अंश नाही’, अशी  जाणीव झाली, तशी भारतातील लसीला विरोध करणार्‍या मुसलमानांना कधी होणार ?

कोरोना लसीचे हलाल प्रमाणपत्र !

चीनने इंडोनेशिया देशात कोरोना लस सिद्ध करून पाठवली आहे; परंतु तेथील मुसलमान नागरिकांनी मोठे आंदोलन करून ‘कोरोना लसही हलाल प्रमाणपत्राची पाहिजे’, अशी अत्यंत अतार्किक आणि हास्यास्पद मागणी केली आहे.