पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यासाठी मार्गस्थ झाले  आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीसाठी अमेरिकेने आमंत्रित केलेले ते आतापर्यंतचे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत.

यापूर्वी वर्ष १९६३ मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् आणि वर्ष २००९ मध्ये डॉ. मनमोहन सिंह हे दौर्‍यावर अमेरिकेला गेले होते. पंतप्रधान मोदी ३ दिवसांत १० कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून २१ जून या दिवशी ते न्यूयॉर्कमध्ये योगदिवसानिमित्त योगासने करणार आहेत. या दौर्‍यात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण, तंत्रज्ञान, धोरणात्मक आणि व्यावसायिक करार होणार आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेतील २० आस्थापनांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही भेटणार आहेत.

अमेरिकेला मार्गस्थ होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटले की, भारत आणि अमेरिका हे विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि संरक्षण क्षेत्रांत भागीदार आहोत. इंडो-पॅसिफिक मुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहेत.