कर्नाटकात अद्यापही गोहत्या बंदी कायदा असल्याने विशेष पशूचा बळी देऊ नये !

जमियत-उलेमा-ए-हिंदच्या कर्नाटक शाखेचे प्रमुख मौलाना कासमी यांचे मुसलमानांना आवाहन !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये सरकार पालटले असले, तरी भाजपने बनवलेला गोहत्या कायदा अद्यापही लागू असल्याने विशेष पशूची हत्या करू नये, असा सल्ला जमियत-उलेमा-ए-हिंदच्या कर्नाटक शाखेचे प्रमुख मौलाना ( इस्लामचा अभ्यासक) मुफ्ती इफ्तेकार कासमी यांनी मुसलमानांना दिला आहे.

मौलाना कासमी यांनी म्हटले की, या विशेष पशूची मोठ्या समाजाकडून पूजा केली जाते आणि तिला गोमाता म्हटले जाते. या पशूची बळी देण्याच्या संदर्भात कायदा असल्याने त्याचा बळी देऊ नये. आपण कायदेशीर अडचणी निर्माण करू नयेत आणि बकरी ईदच्या दिवशी उपद्रव निर्माण करणार्‍यांना संधी देऊ नये.

संपादकीय भूमिका

कायदा असला, तरी धर्मांध गोहत्या करत असतात, हे हिंदूंना ठाऊक आहे ! त्यामुळे ‘अशा प्रकारची विधाने करून गोहत्या होणार नाही’, असे गृहीत धरता येत नाही. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने या कायद्याचे किती पालन होईल, याकडे गोरक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे !