भाविकांना प्रथमच आदिकैलास पर्वतापर्यंत वाहनाने जाता येणार !

उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला आरंभ होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास पर्वत आणि ओम पर्वत येथपर्यंत वाहनाने जाता येणार आहे.

८१ सहस्र डिटोनेटर्स (स्फोटके) आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी करणार्‍या २ जिहाद्यांना बंगालमधून अटक !

बंगाल हा जिहादी कारवायांचा अड्डा बनला असून त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

मेरीलँड (अमेरिका) येथील कॅथॉलिक चर्चमध्ये ८० वर्षांत १५० पाद्रयांकडून ६०० मुलांचे लैंगिक शोषण !

अशा घटनांमध्ये एकाही वासनांध पाद्रयाला शिक्षा झालेली नाही ! चर्चच्या कायद्यामुळेच वासनांध पाद्री शिक्षेपासून स्वतःला वाचवू शकत असल्यानेच या कायद्याचा त्यांच्याकडून अपलाभ उठवला जात आहे. त्यामुळे या कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे !

काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

२ तस्करांना अटक
सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत. 

उत्तरप्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या मुलाच्या वाहनावर बाँबफेक !

प्रयागराज येथील भाजपच्या नेत्या विजयलक्ष्मी चंदेल यांचा मुलगा विधान सिंह यांच्या चारचाकी वाहनावर ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी २ बाँब फेकले. हे आक्रमणकर्ते २ गाड्यांवर आले होते. झूसी भागात ६ एप्रिलला रात्री ही घटना घडली.

पुणे येथे प्रवाशांना लुबाडणार्‍या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ६ कर्मचार्‍यांचे निलंबन !

असे भ्रष्ट आणि लोभी पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? यासाठी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल !

जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या झाली अल्प ! – पोलीस महासंचालक  

काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या अल्प झाली, असे म्हटले, तरी अद्यापही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच आहेत. भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदू तेथे जाऊन राहू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे !

भारतात हिंदूंचे सण पोलीस बंदोबस्तात का साजरे करावे लागतात ? – ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा प्रश्‍न

भारतात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणानंतर हनुमान जयंतीच्या मिरवणुकांना संरक्षण देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे ट्वीट करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणार्‍यांनी स्वतःची पात्रता ओळखून घ्यावी ! – शिवाजीराव पाटील, माजी खासदार

स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाविषयी प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणार्‍यांनी आधी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.