उत्तरप्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या मुलाच्या वाहनावर बाँबफेक !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील भाजपच्या नेत्या विजयलक्ष्मी चंदेल यांचा मुलगा विधान सिंह यांच्या चारचाकी वाहनावर ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी २ बाँब फेकले. हे आक्रमणकर्ते २ गाड्यांवर आले होते. झूसी भागात ६ एप्रिलला रात्री ही घटना घडली. या घटनेत विधान सिंह थोडक्यात वाचले. त्यांच्या कारची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या प्रकरणी विजयलक्ष्मी चंदेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.