भारतात हिंदूंचे सण पोलीस बंदोबस्तात का साजरे करावे लागतात ? – ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा प्रश्‍न

Voice Of Bangladeshi Hindus

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश हा इस्लामी देश आहे. आम्ही आमचे धार्मिक सण बांगलादेशमध्ये पोलीस संरक्षण आणि सुरक्षा दल यांंच्या बंदोबस्तात साजरे करतो; पण भारतातील हिंदूंना त्यांचे धार्मिक सण साजरे करण्यासाठी पोलीस संरक्षण आणि सुरक्षेची आवश्यकता का आहे ?, असा प्रश्‍न ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्याद्वारे विचारण्यात आला आहे.

देहली, बिहार आणि बंगाल येथे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आल्या मिरवणुका !

भारतात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणानंतर हनुमान जयंतीच्या मिरवणुकांना संरक्षण देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे ट्वीट करण्यात आले आहे.


हे वाचा –

देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी !
देहली, बिहार आणि बंगाल येथे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आल्या मिरवणुका !
https://sanatanprabhat.org/marathi/670551.html
केवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका हिंसाचाराच्या सावटाखाली काढाव्या लागतात, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !