भाविकांना प्रथमच आदिकैलास पर्वतापर्यंत वाहनाने जाता येणार !

‘सीमा मार्ग संघटने’ने २० सहस्र फूट उंचीवर सिद्ध केला १३० किलोमीटर लांबीचा रस्ता

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला आरंभ होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास पर्वत आणि ओम पर्वत येथपर्यंत वाहनाने जाता येणार आहे. यासाठी सीमा मार्ग संघटनेने अनुमाने २० सहस्र फूट उंचीवर १३० किलोमीटर लांबीचा रस्ता सिद्ध केला आहे. यापूर्वी भाविकांना तवाघाटपासून पायी जावे लागत होते.

आदिकैलास पर्वत हे भारताचे कैलास मानसरोवरही समजले जाते. चीनच्या कह्यातील तिबेटस्थित कैलास पर्वताचे प्रतिबिंब जसे मानसरोवर तलावात दिसते, अगदी तसेच आदिकैलास पर्वताचे प्रतिबिंब पार्वती कुंडात दिसते.