देहली येथे मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर घरात घुसून गोळी झाडली !

देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

(म्हणे) ‘भारताच्या संसदेत विरोधी पक्षनेत्यांचे ध्वनीक्षेपक बंद केले जातात !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

जगभरात भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या अशा लोकांमध्ये ‘राष्ट्रभक्ती किती आहे ?’ हे स्पष्ट होते ! अशी मानसिकता असलेल्या लोकांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणे, हे भारतियांसाठी दुर्दैवी आहे !

नेपाळच्या पंतप्रधानांना अटक करण्यासाठी तेथील सर्वोच्च न्यायालयात याचिका

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याविरोधात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यात पंतप्रधान प्रचंड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.

अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश चीनचा विकास रोखण्याच्या प्रयत्नात ! – शी जिनपिंग, चीनचे राष्ट्रपती

अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्या या कटकारस्थानाचा अनुभव भारतानेही घेतलेला आहे. येथे काट्याने काटा काढला जात असेल, तर ते भारतासाठी चांगलेच आहे, इतकेच म्हणावे लागेल !

रतलाम (मध्यप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलांची शरीर सौष्ठव स्पर्धा !

देवतांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घेणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे ! त्यादृष्टीने प्रत्येक हिंदूने सजग रहायला हवे !

गुजरातमध्ये इराणी बोटीतून ४२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : ५ जणांना अटक

ओखा किनार्‍यापासून ३४० कि.मी. अंतरावर भारतीय जल सीमा क्षेत्रात ही घटना घडली.

राज्यातील सर्व औषधालयांमध्ये ‘जनौषधी कक्ष’ चालू करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा

आम्ही जनऔषधी दिवसाच्या वेळी गोव्यातील सर्व औषधालयांमध्ये जनऔषधी कक्ष चालू करणार आहोत. येत्या ४८ घंट्यांमध्ये याविषयीचे परिपत्रक काढले जाणार आहे. गोव्यातील अन्न आणि औषध व्यवस्थापनाचे संचालक यावर लक्ष ठेवणार आहेत.

सिंधुदुर्ग : असलदे येथे २ मंदिरांत चोरी,  तर शाळेत चोरीचा प्रयत्न

येथील श्री रामेश्वर मंदिर आणि डामरेवाडी  येथील श्री साईमंदिर येथील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली, तसेच गावठाण, असलदे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीतील कपाट तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.