नेपाळच्या पंतप्रधानांना अटक करण्यासाठी तेथील सर्वोच्च न्यायालयात याचिका

पंतप्रधान पुष्प कमल दहल

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याविरोधात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यात पंतप्रधान प्रचंड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका पंतप्रधान प्रचंड यांच्या जुन्या विधानावरून करण्यात आली आहे. त्या वेळी प्रचंड यांनी ‘देशात फुटीरतावादी संघटनांच्या हिंसाचारामध्ये ५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता’, याची स्वीकृती दिली होती.