सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

६५ जुने कायदे रहित करण्यासाठी संसदेत विधेयक आणणार ! – विधी आणि न्याय मंत्री रिजिजू

२३ वी ‘राष्ट्रकुल विधी परिषद’ ! या परिषदेला ५२ देशांतील ५०० प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. कालबाह्य आणि पुरातन कायदे रहित करण्यासाठी सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली असून गेल्या ८ वर्षांत १ सहस्र ४८६ जुने कायदे रहित केले आहेत.

सोलापूर येथे कांदा प्रश्नावर जनहित संघटनेचे पालकमंत्र्यांसमोर आंदोलन !

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा नियोजन भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला; मात्र विखे पाटील हे निवेदन न स्वीकारता गेले.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ कोटी ४१ लाखांची अफूची बोंडे जप्त !

एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची शेती होणे धोकादायक आहे. प्रशासनाने असे न होण्यासाठी प्रयत्न करावेत !

मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून या मार्गाच्या पहाणी दौर्‍यानंतर मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी समयमर्यादेत वाढ करा ! – शिगमोत्सव समित्यांची गोवा सरकारकडे मागणी

राज्य सरकारने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी रात्री १० पर्यंत समयमर्यादा घातली आहे. या वेळेत रोमटामेळ आणि चित्ररथ यांचे सादरीकरण होऊच शकत नसल्याने सरकारने ही वेळ वाढवून ती रात्री १२ वाजेपर्यंत करावी – पत्रकार परिषदेतील मागणी

राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !

हज समितीच्या अध्यक्षांना  मिळणार राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

याशिवाय गोव्यात ‘हज हाऊस’ उभारण्यासाठी भूमी उपलब्ध करण्यासह हज यात्रेसाठीची रक्कम ३० लक्ष रुपयांवरून १ कोटी रुपये करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

धर्म विसरल्याने भारतातील विविध भागांतील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले