मुसलमान तरुणाला अटक, तरुणीवर रुग्णालयात उपचार चालू !
देहली – येथील नंदनगरी भागात एक अल्पवयीन हिंदु मुलीच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडणार्या कासिम (वय १९ वर्षे) याला देहली पोलिसांनी अटक केली. (केवळ १९ वर्षांच्या असणार्या मुसलमान तरुणाकडे पिस्तुल येथे कुठून ? – संपादक) गोळी लागल्याने घायाळ झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
घर में घुस कासिम ने हिंदू लड़की को मारी गोली, कहा- तेरी दोस्ती किसी और से नहीं होने दूँगा: दिल्ली के नंद नगरी में भारी पुलिस बल तैनात#Delhi https://t.co/ynBmIxNpDT
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 7, 2023
१६ वर्षांच्या या मुलीशी कासिम याची मैत्री होती. तो या मुलीच्या शेजारीच रहातो. तो मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. ‘या मुलीचे अन्य कुणाही तरुणाशी मैत्री असू नये’, अशी कासिम याची इच्छा होती. घटनेच्या दिवशी मुलगी घरी एकटीच असतांना ती भ्रमणभाषवर बोलत होती. त्या वेळी कासिम तिच्या घरात घुसला आणि ‘कुणाशी बोलत आहेस ?’, अशी तिला विचारणा करू लागला. मुलीने याविषयी काहीच न सांगितल्याने कासिमने तिच्या हातातील भ्रमणभाष हिसकावून घेत ती कुणाशी बोलली ?, हे भ्रमणभाषमध्ये तपासू लागला. मुलीने विरोध केल्यावर कासिमने तिच्यावर गोळी झाडली. ही गोळी मुलीच्या खांद्याला लागली. यानंतर कासिम तेथून पळून गेला. कासिम भ्रमणभाषच्या दुकानात काम करतो.
संपादकीय भूमिकादेहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! |