‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब वाहिनीवर निवेदकाकडून अश्लाघ्य प्रकार !
पुणे – ‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब चॅनलवर ‘शिवाजीराजे आणि रामदास, कोर्टाचा मोठा निर्णय’ या विषयावर बोलतांना आशिष मगर यांनी समर्थ रामदासस्वामींना ‘लंगोटवाला’ म्हणून त्यांचा अवमान केला आहे. वर्ष २००८ मध्ये शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी प्रविष्ट केलेल्या याचिकेचा संदर्भ देऊन त्यांनी ‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याबाबत किंवा त्यांची भेट झाली असल्याबाबत कुठलेही ठोस पुरावे नाहीत’, असे म्हटले आहे. ‘केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची अपकीर्ती करण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व अल्प करण्यासाठी समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र दाखवण्यात येते’, असा उल्लेख त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.
या व्हिडिओच्या खाली ‘कमेंट सेक्शन’मध्ये (लोकांना प्रतिक्रिया नोंदवण्याची सुविधा) अनेकांनी मगर यांना समर्थ रामदासस्वामी यांचा निषेध करून अवमान न करण्याविषयी सांगितले आहे.
व्हिडिओची मार्गिका : https://youtu.be/Tas9geUX5dc?si=mUFv6ifL9g3YWuoL
काय आहे प्रकरण ?
दासनवमीनिमित्त वर्ष २००८ मध्ये समर्थ प्रशालेने नगर शहरातून प्रचार फेरी काढली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदासस्वामींच्या पाया पडत आहेत, अशा पद्धतीचा जीवंत देखावा सादर केला होता. त्या वेळी संभाजी ब्रिगेडचे काम करणारे आणि सध्या ‘शिवप्रहार’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी देखाव्याबाबत आक्षेप घेतला होता. भोर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात ‘समर्थ विद्या प्रसारक मंडळा’चे २ विश्वस्त आणि मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदासस्वामींच्या पाया पडतांना दाखवल्यामुळे अवमान झाल्याचा गुन्हा नोंद झाला होता. समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे कुठलेही वस्तूनिष्ठ पुरावे नाहीत, असे विविध पुराव्यांसह न्यायालयात साळुंके नावाच्या व्यक्तीने युक्तीवाद केला होता. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर आरोपीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळून लावली होती. या याचिकेचा संदर्भ देऊन आशिष मगर याने समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य करत समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तसेच त्यांची भेटही झाली नाही, असे म्हटले आहे.
Presenter on ‘ATM Guru’ YouTube Channel ridicules Samarth Ramdas Swami, calls him ‘Langotvala’, claims he wasn’t Chhatrapati Shivaji Maharaj’s Guru.#Denigration #Maharashtra pic.twitter.com/z9Zt1J8ejg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 18, 2024
समर्थ रामदासस्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, याचे काही पुरावे !
१. ‘श्रीसदगुरुवर्य सकळतीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजी राजे मस्तक ठेऊनी विज्ञापनाजे’ अशा मायन्याने चालू झालेले छत्रपती शिवाजी महाराजाचे पत्र समर्थ रामदासस्वामींना पाठवण्यात आले होते. वर्ष १६७८ मध्ये महाराजांनी एक विस्तृत सनद लिहून तब्बल ३३ गावे समर्थांना इनाम म्हणून दिली होती. या सनदेचीच फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनविलेली प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी लंडनमधे आढळली आहे.
२. आज संपूर्ण विश्वात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने गुरु-शिष्य परंपरेत घेतले जाते. तसे ऐतिहासिक दस्तऐवज भारतीय पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर या ठिकाणी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.