अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश चीनचा विकास रोखण्याच्या प्रयत्नात ! – शी जिनपिंग, चीनचे राष्ट्रपती

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा थेट आरोप !

शी जिनपिंग

नवी देहली –  अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्‍चात्त्य देश गेेल्या ५ वर्षांपासून चीनचा विकास रोखण्याचा आणि बाधित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे चीनच्या विकासासमोर अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत, असा आरोप चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी थेट अमेरिकेचे नाव घेऊन केला. ते चीनच्या मुख्य राजनैतिक सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत जिनपिंग यांनी अमेरिकेचे थेट नाव घेतले नव्हते.

विशेष म्हणजे चीनमधील गुंतवणूकदारांनी शी जिनपिंग यांच्यावर ‘जिनपिंग यांच्या राष्ट्रीय सुरक्षेवर भर देण्याच्या धोरणामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची हानी होत आहे’, असा आरोप केला आहे. यासह कोरोना काळातील अन्याय्यी धोरणांमुळेही जिनपिंग यांच्यावर टीका होत आहे. या सूत्रांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी शी जिनपिंग अशा प्रकारची विधाने करत असल्याचेही म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्या या कटकारस्थानाचा अनुभव भारतानेही घेतलेला आहे. येथे काट्याने काटा काढला जात असेल, तर ते भारतासाठी चांगलेच आहे, इतकेच म्हणावे लागेल !