अवकाळी पावसामुळे हानी झालेल्‍या पिकांचे तात्‍काळ पंचनामे करण्‍याचा मुख्‍यमंत्र्यांचा आदेश !

अवकाळी पावसाच्‍या पार्श्‍वभूमीवर ७ मार्च या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्‍य सचिवांसह राज्‍यातील सर्व जिल्‍हाधिकार्‍यांसमवेत ऑनलाईन कॉन्‍फरन्‍स घेऊन हानी झालेल्‍या पिकांचे तात्‍काळ सर्वेक्षण करण्‍याचा आदेश दिला आहे.

औरंगजेबाची चित्रे झळकावणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद करा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, भाजप

आमदार भोसले म्‍हणाले की, औरंगजेबाने त्‍याच्‍या काळात लक्षावधी हिंदूंची हत्‍या केली. महत्त्वाच्‍या देवस्‍थानांना मोठा उपद्रव केला. अशा औरंगजेबाचे कुणी उदात्तीकरण करत असेल, तर मी त्‍याचा जाहीर निषेध व्‍यक्‍त करतो.

पोखरापूर (जिल्हा सोलापूर) येथील जगदंबादेवीचे पुरातन मंदिर भुईसपाट !

विकासासाठी मंदिरे पाडणारा पुरातत्व विभाग आणि प्रशासन कधी या कारणासाठी रातोरात मशिदी पाडण्याचे धाडस दाखवणार का ?

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश  

वेब सिरीजमधील भाषा अश्‍लील आणि अभद्र !

केनियामध्ये स्थानिक नागरिकांकडून चिनी व्यवसायिकांच्या विरोधात आंदोलन !

चीन ज्या देशात जातो, तेथील अर्थकारण स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करून त्या देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी करतो. केनियामध्ये हेच घडले आहे. भारतात हे घडण्याआधी सरकारने चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालावी !

पाकिस्तानमध्ये होळी खेळणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण : १५ घ्यायाळ

होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची अनुमती घेतल्याचे हिंदु विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. ‘कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत’, असे पंजाब विद्यापिठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद यांनी सांगितले. 

अरण्येश्‍वर (पुणे) भागात घरात असलेल्या काळूबाई मंदिरात दागिने आणि पैसे यांची चोरी !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे दुर्दैवी !

प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ या वर्षीही १०० टक्के यशस्वी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग २१ वर्षे धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येत आहे. रासायनिक रंग खेळून खडकवासला धरणात उतरणार्‍या नागरिकांचे मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्याचे हे अभियान या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.

विद्यार्थिंनी आणि शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक

पाकव्याप्त काश्मीर सरकारने नुकत्यात काढलेल्या एका आदेशात तेथील शाळा आणि महाविद्यालये यांत शिकणार्‍या विद्यार्थिंनी अन् शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक केले आहे.  सरकारच्या या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.