कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा !

शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्‍या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवले

भारतीय नौदलाच्या ‘स्वदेशी ध्रुव’ हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. या हेलिकॉप्टरमधील तिघा जणांना नौदलाच्या गस्ती जहाजाने वाचवले.

लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी आणखी ३०० वर्षे लागतील !

जगभरात महिलांच्या अधिकारांचा दुरुपयोग केला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. महिला आणि मुली यांना सार्वजनिक जीवनातून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आर्थिक विकासदरात ६.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित !

२०२२-२३ च्या रब्बी हंगामात ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्यांच्या उत्पादनात ३४ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.

(म्हणे) ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना

अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !

पाकने काश्मीरचा प्रश्‍न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !

मध्यप्रदेशातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत आदिवासी मुलींचा लैंगिक छळ !

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये नन आणि मुले यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत. आता ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्येही असे प्रकार घडतात, हे संतापजनक ! अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, हे हिंदु पालकांनी ठरवावे !  

स्त्रियांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक ! – राज ठाकरे

सर्व चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड चालू आहे, ती थक्क करणारी आहे. सर्वच ठिकाणच्या स्त्रिया जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता.

मुंबईमध्ये बनावट संदेशाद्वारे ४० नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची लुट !

मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.