संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !

बिलावल झरदारी आणि रूचिरा कंबोज

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये महिलादिनाच्या निमित्ताने महिला, शांतता आणि संरक्षण यांवर चर्चा चालू असतांना काश्मीरचे प्रश्‍न उपस्थित केले.

त्यावर भारताने बिलावल झरदारी यांना फटकारले. भारताच्या प्रतिनिधी रूचिरा कंबोज यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला उत्तर देणेही आम्ही योग्य समजत नाही. त्यांची टीका उत्तर देण्यायोग्यही नाही. ही टीका आधारहीन आणि राजकारणाने प्रेरित आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकने काश्मीरचा प्रश्‍न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !
  • भारताने आता पाकव्याप्त काश्मीर पाकच्या कह्यातून मुक्त करून हा प्रश्‍न कायमचा सोडवून टाकावा !