भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवले

मुंबई – भारतीय नौदलाच्या ‘स्वदेशी ध्रुव’ हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. या हेलिकॉप्टरमधील तिघा जणांना नौदलाच्या गस्ती जहाजाने वाचवले.

या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने ट्वीटद्वारे या घटनेची माहिती दिली.