(म्हणे) ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना

  • तमिळनाडूतील ‘टीपीडीके’च्या कार्यकर्त्यांची समाजद्रोही मागणी !

  • ब्राह्मण आणि उत्तर भारतीय यांच्या भरतीला विरोध

चेन्नई – तमिळनाडूमध्ये सत्तेत असलेल्या द्रमुक पक्षाचा समर्थक असणार्‍या ‘थंथाई पेरियार द्रविड कळघम संघटने’नेे (‘टीपीडीके’ने) शास्त्री भवनाच्या समोर निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये येथे आरक्षण लागू करावे आणि तमिळनाडूमध्ये सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींच्या भरतीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी केली.


‘सरकारी नोकर्‍यांमध्ये उत्तर भारतीय आणि ब्राह्यण यांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती होत आहे’, असा आरोप करत ‘टीपीडीके’ने या वेळी त्याला विरोध केला. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. ‘काही आंदोलकांना कह्यात घेण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !