मध्यप्रदेशातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत आदिवासी मुलींचा लैंगिक छळ !

उजवीकडे मुख्याध्यापक नानसिंह यादव

दिंडोरी (मध्यप्रदेश) – येथील एका ख्रिस्ती मिशनरी शाळेतील आदिवासी मुलींनी शाळेचे मुख्याध्यापक नानसिंह यादव आणि अन्य शिक्षक यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. ‘खोलीत एकटीला बोलावून अश्‍लील कृत्य केले गेले’, असा आरोप पीडित मुलींनी केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुख्याध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य ३ आरोपी शिक्षक पसार झाले आहेत. दिंडोरीतील जुनवानी गावात रोमन कॅथॉलिक समुदायाच्या ‘जबलपूर डायोसेसन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने ही शाळा चालवली जाते. या शाळेतील ८ पीडित विद्यार्थिनींनी दिंडोरी महिला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

पीडित मुलींनी लैंगिक छळाची तक्रार शाळेतील शिक्षिका सिस्टर सविता यांच्याकडे केली असता त्यांना बांबूच्या काठीने मारहाण करण्यात आली. (स्त्री असूनही मुलींवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्याऐवजी त्यांना मारहाण करणार्‍या सिस्टर सविता या स्त्रीजातीला लागलेला कलंक ! – संपादक) पीडित विद्यार्थिनींनी लैंगिक छळाविषयी चर्चचे फादर शनी यांनी सांगितले असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (अशा पाद्य्रांवरही कारवाई करा ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये नन आणि मुले यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत. आता ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्येही असे प्रकार घडतात, हे संतापजनक ! अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, हे हिंदु पालकांनी ठरवावे !