लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी आणखी ३०० वर्षे लागतील !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अ‍ॅटोनियो गुटेरस यांची खंत

अ‍ॅटोनियो गुटेरस

न्यूयॉर्क (अमेरिका) – लैंगिक समानतेच्या दिशेने होणारी प्रगती आता आमच्या दृष्टीआड झाली आहे. सध्याच्या अनुमानानुसार लैंगिक समानता येण्यासाठी जगाला आणखी ३०० वर्षे लागतील, अशी खंत विधान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अ‍ॅटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली. ते आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

गुटेरस यांनी अफगाणिस्तानसह काही देशांची नावे घेऊन सांगितले की, तेथे मुलींचे अल्पवयात लग्न लावून दिले जाते. त्यांचे अपहरण केले जाते. त्यांना शाळेत जाण्यास विरोध केला जातो, तसेच त्यांच्यावर आक्रमणे कली जातात. यावरून ‘लैंगिक समानता प्राप्त करण्याची अशा अधिकाधिक दूर जात आह’, हे स्पष्ट होते. जगभरात महिलांच्या अधिकारांचा दुरुपयोग केला जात आहे.

त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. महिला आणि मुली यांना सार्वजनिक जीवनातून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.