दलाई लामा यांच्याकडून ८ वर्षीय मुलाला बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा नेता म्हणून घोषित !

सामाजिक माध्यमांवर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि मुलाला भेटतांना दिसत आहेत. या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

(म्हणे) ‘पंजाबमधील घटनांकडे आमचे बारीक लक्ष !’ – कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताऐवजी कॅनडामध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तान्यांकडून होणार्‍या आक्रमणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे !

पाकिस्तानमध्ये श्री हनुमानाचा अवमान करणार्‍या मुसलमान पत्रकाराला अटक !

भारतात विविध माध्यमांतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात; मात्र बहुतांश वेळा संबंधितांवर कारवाई होत नाही. पाकमधील या कारवाईवरून भारताने बोध घ्यावा !

मध्यप्रदेश आणि कर्नाटक यांच्या धर्तीवर लव्ह जिहादची प्रकरणे पडताळणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. विधानसभेतही ‘लव्ह जिहाद’चे सूत्र उपस्थित केले गेले.

मुसलमानांना ४ विवाह करू देण्याच्या अनुमतीच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका !

न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस !

विधीमंडळ कामकाजाविषयी सरकारची एकप्रकारे अनास्था आणि बेफीकिरी जाणवली ! – अजित पवार, विरोधी पक्षनेता

मला खेद आणि दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतील हे पहिले अधिवेशन असेल की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांची सभागृहातील उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकदा आली.

रशिया बेलारूसमध्ये आण्विक शस्त्रे तैनात करणार !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शेजारील मित्र देश बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली आहे. ‘माझ्या या निर्णयामुळे अण्वस्त्र कराराचे उल्लंघन होत नाही. अमेरिकेने तिची अण्वस्त्रे इतर देशांमध्येही तैनात केली आहेत आणि आता आम्हीही तेच करत आहोत.

मथुरेतील संस्कृती विद्यापिठात काश्मिरी मुसलमानांनी केले नमाजपठण !

कारवाई न झाल्यास हनुमान चालिसाचे पठण करू ! – अखिल भारतीय हिंदु महासभा

पाकमध्ये हिंदु दुकानदारांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित !

मागणीनुसार बिर्याणी बनवणार्‍या हिंदु दुकानदारांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित केल्याची घटना पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे घडली; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांचा दावा आहे की, ही घटना पाकच्या पंजाबमधील बहावलपूर येथील आहे.

श्रीरामनवमी आणि छठपूजा या कालावधीत ७५ डेसीबलपेक्षा अधिकच्या आवाजावर प्रतिबंध !

बिहारच्या नीतीश कुमार सरकारचा फतवा !
अजानवर असे प्रतिबंध का नाहीत ? – विहिंप