मथुरेतील संस्कृती विद्यापिठात काश्मिरी मुसलमानांनी केले नमाजपठण !

कारवाई न झाल्यास हनुमान चालिसाचे पठण करू ! – अखिल भारतीय हिंदु महासभा

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध संस्कृती विद्यापिठाच्या बागेमध्ये काही काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. याच्या विरोधात मथुरेतील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या असून त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास विद्यापिठात हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, अशी चेतावणी दिली आहे. यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले आहे.


महासभेचे जिल्हा पदाधिकारी छाया गौतम यांनी म्हटले की, विद्यापिठात पुष्कळ दिवसांपासून उघडपणे नमाजपठण होत असल्याची माहिती मिळाली होती; परंतु त्याचा पुरावा आज मिळाला आहे. विद्यापिठातील ८२ टक्के मुसलमान विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत आहेत. गेले ६ दिवस नमाजपठण केले जात आहे, असा दावाही छाया गौतम यांनी केला.

दुसरीकडे विद्यापिठाचे अधिकारी किशन चतुर्वेदी यांनी हे प्रकरण एक मास जुने असून संबंधित विद्यार्थ्यांना या प्रकारावरून समज देण्यात आली होती, असा दावा केला आहे.

संपादकीय भूमिका

येथे काश्मिरी मुसलमानांच्या ठिकाणी जर कुणा हिंदु विद्यार्थ्यांनी पूजापाठ केला असता, तर एव्हाना पुरो(अधो)गाम्यांची टोळी हिंदूंच्या विरोधात कंठशोष करत सुटली असती, तसेच भारतीय शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण होत असल्याची बांगही ठोकली असती, हे लक्षात घ्या !