श्रीरामनवमी आणि छठपूजा या कालावधीत ७५ डेसीबलपेक्षा अधिकच्या आवाजावर प्रतिबंध !

  • बिहारच्या नीतीश कुमार सरकारचा फतवा !

  • अजानवर असे प्रतिबंध का नाहीत ? – विहिंप

दरभंगा (बिहार) – येथील जिल्हा प्रशासनाने पुढे येणार्‍या श्रीरामनवमी आणि छठपूजा या उत्सवांच्या वेळी लावण्यात येणार्‍या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची पातळी ही ७५ डेसीबलपेक्षा अधिक असल्यास संबंधितांच्या कार्यक्रमावर प्रतिबंध लादण्यात येईल, असा आदेश काढला आहे. या आदेशाच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्वीट केले असून ‘अशा प्रकारचे दिशानिर्देश हे अजान आणि ताजिया (मोहरमच्या काळात काढण्यात येणारी मिरवणूक) यांसाठी का दिले जात नाहीत ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अन्य आदेशांमध्ये रामनवमीनिमित्त काढण्यात येणार्‍या नव्या शोभायात्रांना अनुमती नाकारण्यात आली आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

गेल्यावर्षी ८ राज्यांमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमणे केली होती. यामुळे खरेतर धर्मांधांवर वचक बसवण्याचे सोडून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राजद यांचे युती सरकार हिंदूंनाच वेठीस धरत आहे, हे संतापजनक !